आई गं.... | Mummy ❤

आई गं.... 



         
          
          सायंकाळ ची वेळ होती, ती ऑफीस वरून नुकतीच परतली होती, माहिती नव्हत काय नेमकं झालेलं, अचानक रुम मध्ये कुणीच नाही पाहिलं व ढसाढसा रडू लागली.

           नेमक काय झालं होतं काहीच उमजत नव्हत, दिवसभराचा ऑफीस मधला थकवा होता, की त्या चार दिवसात होणारी चिडचिड होती, की मायेने पाठीवर हात फिरवणारं कोणी नव्हत , का लोकांनी तिच्या बदल केलेला गैरसमज होता. काहीच समजत नव्हतं तिला, फक्त तोंडातून एकच आवाज होता.... 

आई गं.... आई गं.... आई गं.... आई गं.... 

रोज कामावरून, शाळेतून परतल्यावर तिचा चेहरा पाहायला मिळतं असेल तर तुम्ही खूप नशिबवान आहात, तिला जपा.... ❤( आई ) 


ध्येय प्राप्तीसाठी व जबाबदारी मुळे काटेरी मार्ग निवडावा लागतो .... 



Miss you mummy.... ❤


सुप्रिया ..... 
28/4/2022
7.14 pm

Post a Comment

Previous Post Next Post