Badam milk recipe | Hot winter drink | बादाम केसर दुध

Badam dudh | बनवा पौष्टिक बदाम दूध | Badam milk recipe | Almond milk | बादाम दुध | Badam milkshake


मस्त थंडीचे दिवस चालू आहेत तुम्ही सकाळ-संध्याकाळ हे बदाम दूध पिऊ शकता. अतिशय पौष्टिक आहे .अनेकदा काहीजणांना दूध आवडत नाही, त्यांनी अशाप्रकारे बदाम दूध करून देऊ शकता.



बदाम दुध बनवण्यासाठी साहित्य-

दूध -अडीच कप
साखर -चवीनुसार किंवा दोन चमचे
बदाम -15
केसर -सहा-सात काड्या
वेलची-१


कृती-

सर्वात आधी गॅस वर एक पातेले गरम करायला ठेवायचा आहे.
यामध्ये आता अडीच कप दूध घालायचे आहे व छान उकळी काढायची आहे.

त्यानंतर या मध्ये दोन चमचे साखर घालायची. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा.

इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये 15 बदाम व एक वेलची बारीक करून घ्यायची. जाडसर बारीक करून घ्या.

आता बारीक केलेले दुधामध्ये टाकायचे व छान उकळी काढून घ्यायचे.

तीन-चार मिनिटे त्याला छान शिजू द्यायचा आहे यासाठी गॅस लहान आचेवर ठेवा व त्याचबरोबर यामध्ये केसर घालायचा आहे.

एक चार ते पाच मिनिटानंतर दोन कप बदाम दूध तयार आहे.


अशाच नवनवीन रेसिपीज साठी या ब्लॉग ला फॉलो करा.

व नवनवीन रेसिपी व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चैनल ला जरूर सबस्क्राईब करा.



1 Comments

  1. कोल्हापूर म्हटल की, खान्यासाठी तडजोड मुळीच नाही. स्वादिष्ट👌👌

    ReplyDelete
Previous Post Next Post