प्रेम, आपुलकी, जिव्हाळा - पप्पा


प्रेम, आपुलकी, जिव्हाळा - पप्पा 



तुमच्या विषयी काय लिहावं, कारण २१ वर्ष झाले आपलं 'बाप-लेकीचे' नाते. 
मला आठवतय मी ३ वर्षाची असताना, तुम्ही कामावर जायचा व तुम्ही येताना चॉकलेट आणार म्हणून मी कट्टावर दुपारपासून वाट बघत बसायची. 
न चुकता रोज तुम्ही मला काहीतर आणायचा त्यानंतर अनिकेत चा जन्म झाला मला वाटलं आता सगळे बदल तरीही काहीच बदल नव्हतं, मम्मी माहेरी होती अनिकेत झाल्यावर तरीही मी मम्मी सोबत मामाकडे न जाता, तुमच्या जवळ च रहायचा हट्ट धरला व तुम्ही कामावर गेला की वाट बघत बसायचे, आसपास पलिकडे दीदी भैय्या होतेच. 
मी अस एकटीच म्हणून मम्मी तिथं राहणं योग्य वाटल नाही व १ महिन्यात ती परत आली. 
हळुहळू आम्ही मोठे झाले, तुमचे मित्र व आसपासची म्हणतात सगळं तुम्ही शून्यातून उभा केलं व तुम्ही नेहमी म्हणता जशी माझी पोर आलीत आयुष्यात तशी माझी प्रगती झाली. ही शब्द ऐकून मन भरून येतेयं. 
तुम्ही नेहमी आम्हाला कशाची कमी पडू दिली नाही व एखाद्या वेळी चुकीचा हट्ट केला तर समजून सांगितले म्हणून आपलं नातं खुप चांगलं बनतं गेलं. 
रात्री सगळ्यांनी एकत्र जेवायचे व दिवसभरात काय काय घडले हे चर्चा करायची, त्यामुळे घरातही भारी वाटतयं.  
लहानपणी २-३ वेळा तुमचा हात सोडून मी गाडीच्या आडवी गेलोय व पडलोय म्हणून अजूनही तुम्ही माझा हात पकडता. 
जेव्हा तुम्हाला सुट्टी नसते तेव्हा मी बॅकेचे काम करते असे म्हणले की तुम्ही म्हणता मुलं आता खुप मोठी झालीत. 
माझ्या केसांवर खुप comments येतात, खुप मोठी आहेत , छान आहेत अस , याच श्रेय पण तुम्हालाच. लहानपणी मला केस वाढवायची होती पण नेहमी तुम्ही माझा boy cut ठेवला, कारण मी आजारी पडते, आठवी नंतर मी केस वाढवली तेव्हा मला नको होतीत मोठी केस पण तुम्ही म्हणला छान दिसतात, म्हणून तुमच्या साठी मी केस वाढवली. 
अनिकेत व माझ्यात कधीच फरक केला नाही. 
आपल्या ९९% आवडी सेमच आहेत. मी सहावी त होते तुम्ही आजरी पडला होता मी खुप भिलेलो तेव्हा पण मेडिसिन मुळे नीट झाले. व लहानपणी मी सारखी आजारी पडायचे तुम्ही रात्रभर जागेच. 
सगळ्याचा विरोध असून मला Engineer व्हायचे आहे, म्हणून मला engineering ला घातलं, नेहमी माझ्यावर विश्वास ठेवला, हा विश्वास मी कधीच मोडू देणार नाही.
हेच आपल्या प्रेम, जिव्हाळा आहे की मला कधी चुकीचे पाऊल घेऊ देत नाही. 
आपलं नात असच रहावं व माझ आयुष्य तुम्हाला लाभावं ❤
(अजून खुप काही आहे पण शब्दात लिहता नाही येणार.... )

तुमची लाडकी पिया ❤.... 


3 Comments

Previous Post Next Post