पौष्टिक व खमंग मेथी पराठा रेसिपी | Methi paratha recipe | मेथी पराठे

पौष्टिक व खमंग मेथी पराठा रेसिपी | Methi paratha recipe | मेथी पराठे 



मस्त थंडीचे दिवस चालू झालेली आहे.मेथीच्या भाजीचा सीजन चालू झालेला आहे. या मस्त थंडी मध्ये तुम्ही मऊ लुसलुशीत गरमागरम पौष्टिक असे मेथीचे पराठे बनवू शकता पराठे बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे.खूप जबरदस्त लागतात व लहान मुलांच्या किंवा सगळ्यांच्या डब्यासाठी किंवा प्रवासामध्ये खाण्यासाठी एक नंबर योग्य पदार्थ आहे.जर घरामध्ये कोणी मिळती खात नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने पराठे करून त्यांच्या जेवणामध्ये समाविष्ट करू शकता.




साहित्य -
मेथीचे पराठे करण्यासाठी लागणारे साहित्य,
-मेथीची पाने दीड वाटी गव्हाचे पीठ दोन वाटी 
-बेसन पीठ लहान दोन चमचे 
-ओवा लहान एक चमचा 
-तीळ दोन चमचे 
-धने व जिरे पावडर एक चमचा 
-गरम मसाला एक चमचा 
-लाल तिखट एक चमचा 
-लसूण आलं व मिरची पेस्ट दीड चमचा 
-चवीनुसार मीठ
-एक चमचा हळद 
-आवश्यकतेनुसार पाणी 
-तेल किंवा तूप.


कृती-

•सर्वात आधी पीठ बेसन पीठ व मेथी सोडून इतर राहिलेले जिन्नस सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे, निट मिक्स झाल्यानंतर यामध्ये मेथी घालायची व सर्व एकत्र करून घ्यायची .

•एकत्र करून झाल्यानंतर हळूहळू यामध्ये पाणी घालत त्याला मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना एक काळजी घ्यायची आहे.म्हणजे हे पीठ जास्त पातळ होऊ नये पिठाचा गोळा तयार करून घ्या त्यावर एक चमचा तेल घाला व छान त्याला मळून घ्या पंधरा मिनिटाला तसंच रेस्ट करायला ठेवा.

•पंधरा मिनिटानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे गोळे करून पिठाच्या साह्याने पराठे लाटून घ्या.

•चपाती भाजतो त्याच पद्धतीने तव्यावर भाजून घ्या भाजताना तेलाचा किंवा तुपाचा वापर करा व 

•भाजल्यानंतर हे पराठे गरमागरम शेंगदाण्याची चटणी तूप किंवा लोणचे याबरोबर वाढायला घ्या.


मेथीचे पराठे कसे बनवायचे याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा.



नवनवीन रेसिपीज साठी आपल्या ब्लॉग ला फॉलो करा त्याचबरोबर युट्युब वर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.

"थंडीमध्ये खाण्यासाठी गरमागरम मस्त मऊ लुसलुशीत मेथीचे पराठे तयार आहेत."


•रेसिपी क्रेडिट -सुप्रिया पाटील.

Post a Comment

Previous Post Next Post