मार्गशीर्ष लक्ष्मी व्रत कसे करावे? का करावे? केव्हा करावी? | Margshirsh Lakshmi Pooja 2021

मार्गशीर्ष लक्ष्मी व्रत कसे करावे? का करावे? केव्हा करावी? | Margshirsh Lakshmi Pooja 2021





मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार ची पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिना हा नोव्हेंबर-डिसेंबर या दरम्यान येतो. या वर्षी 4 डिसेंबर पासून मार्गशीष महिना चालू झालेला आहे. या महिन्यातील सर्व गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते .यामुळे महालक्ष्मी प्रसन्न होते असा भक्तांचा विश्वास आहे .ही पूजा कशी करतात याची माहिती आपण या ब्लॉगमध्ये घेणार आहे.


मार्गशीष महिन्यातील पूजा करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला महालक्ष्मीचा एक फोटो हवा असतो. त्याचबरोबर पितळेचा एक तांब्या ,त्यामध्ये पाच विविध फळांच्या झाडाची पाच ढाळे किंवा पाने हवी असतात,त्याचबरोबर एक नारळ हवा असतो, तांब्या मध्ये घालण्यासाठी सुपारी ,अक्षदा ,दूर्वा ,हळदी कुंकू ,एक रुपयाचा सिक्का अशा विविध गोष्टी लागतात त्याचबरोबर नैवेद्य लागतो, फुले लागतात.

मार्गशीष महिन्यातील पूजा कशी करायची हे पहायचे असेल, तर तुम्ही खालील लिंक वर क्लिक करू शकता व संपूर्ण पूजेचा व्हिडिओ पाहू शकता.



चला तर मग ही मार्गशीष महिन्यातील पूजा कशी करतात ते पाहूयात ....
सर्वात आधी देवा समोर एक पाठ घ्यायचा त्यावर नवीन कापड अंथरायचे. कापडावर तांदळाच्या सहाय्याने स्वास्तिक काढून घ्यायचे .त्यावर आता पितळेचा तांब्या ठेवायचा तांब्या ला आठ हळदी कुंकवाची बोटे ओढायची. त्याचबरोबर ताब्यामध्ये अक्षदा ,दूर्वा ,लिंबू ,एक रुपयाचा सिक्का, हळदीकुंकू घालायची त्यावर पाच प्रकारची फळांची पाने  किंवा ढाळे ठेवायचे व नारळ ठेवायचा त्याचबरोबर साईडला पुढे सुपारी व खाऊच पान ठेवायचं श्री गणेशाची पूजा करून घ्यायची .देवीचा फोटो हे आपण पुजलेला असतो .बाजारामध्ये गुरुवारची पूजेसाठी एक पुस्तक मिळतं. ते पुस्तक ठेवायचं नैवेद्यासाठी फळे ठेवायची. एका वाटीमध्ये पाणी ठेवायचं ,त्याचबरोबर तुम्ही दूध ठेवू शकता नैवेद्यासाठी तुम्ही गोड-धोड बेसन चे लाडू किंवा पुरी श्रीखंड बनवू शकता. समई लावायची पूजा करून घ्यायची मार्गशीष महिन्यातील चे पुस्तक मिळते. त्यामध्ये संपूर्ण पूजा लिहिलेली असते ती वाचून घ्यायची ,त्यानंतर देवीची आरती म्हणून घ्यायची अशा पद्धतीने संपूर्ण संपूर्ण पूजा करून घ्यायची आहे.


मार्गशीष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अशीच पूजा करून घ्यायचे आहे. गुरुवारी सायंकाळी किंवा दुपारच्या वेळेला ही पूजा मांडायची शुक्रवारी सकाळी ही पूजा काढायची व ज्या ठिकाणी पूजा मांडलेले असते, त्याठिकाणी पाच हळदी कुंकवाची बोटे लावायची या दिवशी उपवास करायचा असतो.  उपवासाला तुम्ही खिचडी किंवा फळे खाऊ शकता व उपवास रात्री पूजा वाचल्यानंतर सोडायचा पूजेसाठी पंचामृत महत्त्वाचे आहे. अशाच पद्धतीने प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्ही महालक्ष्मीची अशा पद्धतीने पूजा करू शकतात.

कसा वाटला ब्लॉग नक्की कळवा. नवीन ब्लॉग साठी या पेज ला फॉलो करा नोटिफिकेशन ओन करा.

Post a Comment

Previous Post Next Post