महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती | maharashtrian food | kolhapur food | कोल्हापूरची खाद्यसंस्कृती

महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती

 इतिहास, संतपरंपरा ,शेती, विज्ञान , तंत्रज्ञान, कला, साहित्य, क्रिडा , पर्यटन असो वा औद्योगिक विकास सगळ्यात अव्वल असलेला माझा महाराष्ट्र " खाद्यसंस्कृती " मध्ये कसा मागे असेल. 

जशी भाषेमध्ये विविधता तशीच इथल्या खाद्यपदार्था मध्ये ही विविधता आहे. 

महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती मध्ये प्रामुख्याने कोंकणी, पुणेरी, मराठवाडी, कोल्हापुरी, खानदेशी, वऱ्हाडी असे पाच प्रकार आहेत. 


आज पाहुया आमची कोल्हापूरी  खवय्येगिरी

... 

पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक वारसा लाभलेलं कोल्हापूर. 

पर्यटकांना आकर्षित करणार कोल्हापूर. 

इथल्या भाषेत गोडवा असलेलं कोल्हापूर. 

जीवला जीव देणारी माणसं जिथं ते कोल्हापूर. 

व प्रत्येक खवय्यांचा मनात राज्य करेल असे कोल्हापूर. 


बोलाव तितक कमी पडेल अशी कोल्हापूरची खाद्यसंस्कृती झणझणीत पणा येथील वैशिष्ट्य. 

कोल्हापूर म्हणजे पोटभर खा आणि बिनधास्त फिरा. 

कोल्हापूर म्हणलं पटकन मनात येत तांबडा पांढरा रस्सा. 

कोल्हापूरच्या रश्शाची चव म्हणजे एक नंबर. 

 kolhapuri Non Veg Recipes

गरमगरम चुलीवरची भाकरी मटण ( काळं मटण व मटण मसाला) व झणझणीत रस्सा एक वेगळाच आनंद देतो, मटणप्रेमी खास वेळ काढून येतात फक्त तांबड्या पांढरा रस्सा (Pandhara Rassa) साठी. कारण येथील मसाला मध्ये च एक वेगळी चव असते व मनामध्ये खुप सार प्रेम. 

त्याचबरोबर शाकाहारी मंडळी साठी व्हेज कोल्हापूरी आकर्षक आहे. मटणाचे बरोबरच व्हेज कोल्हापूरी ही तेवढीच प्रसिद्ध .

महाराष्ट्रीयन थाळी

महाराष्ट्रात मिसळ म्हणजे सुख, पण कोल्हापूरी कटाची मिसळ म्हणजे शेवट. जर पहिल्यांदाच कोल्हापूरी मिसळ खात असाल तर जपूनच नाका डोळ्यातून पाणी आलच समजायच. अशी झणझणीत मिसळ फक्त कोल्हापूरातच. 

अनेक पर्यटक येथील येथील खाद्यपदार्थ चा आस्वाद घेतात व तृप्त होऊन जातात


झणझणीत कोल्हापूरी मिसळ





Non Veg Recipes

Subscribe my Youtube channel


1 Comments

Previous Post Next Post