आकाड महिना व गटारी स्पेशल- सुक्क मटण | सुक्क चिकन | कोल्हापुरी मटन

आकाड महिना व गटारी स्पेशल- सुक्क मटण | सुक्क चिकन | कोल्हापुरी मटन 



             आकाड महिन्याचे शेवटचे आठ दिवस राहिलेले आहेत तर यामध्ये आपण मस्त अशी एक झणझणीत गटारी स्पेशल रेसिपी पाहुयात कारण 9 ऑगस्टपासून श्रावणाची सुरवात होत आहे त्याआधी आपण एक मस्त भन्नाट अशी रेसिपी बघुन घेउया म्हणजे तुम्हाला या आकाड महिन्यात ही करून पाहता येईल.


सुक्क मटण |  सुक्क चिकन


उकड काढण्याची योग्य पद्धत- 

1.सुक्क मटण करण्यासाठी सर्वात आधी एक किलो मटण स्वच्छ धुऊन घ्या यानंतर आपण याला उकड काढून घेणार आहे.
2.यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी तेल गरम करायला ठेवा तेल गरम झालं की यामध्ये जे स्वच्छ धुतलेले मटन आहे ते घाला. त्याचबरोबर मीठ घाला व एक चमचा हळद घाला मीठ चवीनुसार वापरायचा आहे आता याला छानसा हलवून घ्या गॅस हा मध्यम आचेवर ठेवा प भांड्यावर झाकण लावून याला पाच मिनिटं तसंच राहू द्या .
3.त्यानंतर पाच मिनिट झाले की त्याला परत हलवून घ्या मिठामुळे म्हणाला छान पाणी सुटलेले असेल परत त्याला असंच झाकून ठेवा जर मटन खाली लागते असं वाटलं तर थोडसं एक दोन वाटी पाणी गरम केलेलं घाला अशाच पद्धतीने एक दहा मिनिट मटन छान शिजू द्या पेक्षा जास्त वेळ लागतो चिकन असेल तर चिकन झटपट शिस्त तुम्ही मटण आधी शिजवून घेऊ शकता जेव्हा तुम्हाला वाटेल की मटण आपलं शिजलेला आहे.
4. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पाणी हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घाला पाणी गरम असावा उकळी काढून घ्या आपलं मटण उकडून तयार आहे आता यामधून मटणाचे पाणी वेगळं करा व फोडे वेगळी करा.

सुक्क मटण

साहित्य-

तीळ 5 चमचे, जिरे दोन चमचा, लसणाच्या दहा-पंधरा पाकळ्या, आल्याचे तीन-चार तुकडे ,तमालपत्र एक पान,दालचिनी एक तुकडा ,वाळलेला खोबरं तीन ते चार चमचे व कोथिंबीर.


कृती

1.सर्वात आधी तीळ जिरे , दालचिनी व तमालपत्र गॅसवर थोडेसे गरम करून घ्यायचे त्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये  फिरवून घ्यायचे यानंतर यामध्ये लसुन आले कोथिंबीर व खोबरं घालून एकदा वाटून घ्यायचं 2.त्यानंतर पाण्याचा वापर करायचा व छान पेस्ट करून घ्यायची आपला मटण चिकन करण्यासाठी लागणारा मसाला तयार आहे.

सुक्क मटण करण्यासाठीची ग्रेवी


1.एका कढईमध्ये एक वाटीभर तेल घ्यायचा आहे यामध्ये एक कांदा चिरून घालायचा आहे कांद्याला तीन ते चार मिनिट छान परतायचं.
2. त्यानंतर यामध्ये आपण वाटण केलेला मसाला घालायचा आहे मसाला एक चार ते पाच मिनिट छान भाजून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण चटणी म्हणजेच लाल तिखट घालणार आहोत व दोन-तीन मिनिट शिजू देणार आहोत.
3. जेव्हा मसाला तेल सोडायला सुरुवात करीत त्यानंतर यामध्ये मटणाची फोडी घालायचे आहेत व हलवून घ्यायचे आहे जर मीठ लागत असेल तर थोडीच घालायचा आहे व त्याचबरोबर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला ही वापरू शकता. 
4.मस्त झणझणीत मटन सुक्का तयार आहे.अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता व व्हिडिओ पाहू शकता.


Visit My youtube channel for delicious recipe .thank you.

Post a Comment

Previous Post Next Post