मर्यादा - एक स्त्री | Limits- woman


मर्यादा - एक स्त्री


            स्त्री शिकलेली असुदे, पैसे कमावणारी असुदे,लहान असुदे वा मोठी असुदे, कशीही असुदे. ती स्त्री आहे म्हणून हा समाज नेहमीच तिला मर्यादेत राहण्यासाठी बोल लावतो. 

            नात मुलीच असो, बहिण-भावाच,प्रेयसीचे असो, बायको चे असो वा मैत्रीच असो, नेहमीच तिने एका सीमेच्या आत राहलं पाहिजे का कारण ती स्त्री आहे. तिची लाज, अब्रू महत्त्वाची म्हणून तिने नीट राहायचं मन मारत, पण विकृत लोक कधीच बदलत नाही.

            ती साधी असेल तर साधी आहे म्हणून बोलतात, modern असेल तर संस्कृती जपत नाही म्हणून बोलतात, बारीक आहे तर तिच जेवण काढतात व जाड असेल तर मजाक बनवतात.  

बोटावर मोजण्या एवढीच माणसे आहेत जी नात्यात समानता ठेवतात. नाहीतर माहेरी असो सासरी, किंवा work space वर तिला नेहमी वेगळच लेखलं जात.  

          हो ती असते शारीरिक रित्या कमजोर व मानसिक स्वास्थ्य एवढं मजबूत असत की, तुम्ही विचार ही करू शकत नाही. महिन्यात ४-५ दिवस त्रास सहन करणं एवढं सोपं नाही आणि हा त्रास स्त्री शिवाय दुसरं कोणी अनुभवू शकत नाही. 

फक्त म्हणायला असते स्त्री पुरुष समानता पण स्त्रियांवरील मर्यादा काही कमी होत नाही.

           तिच्या पायातल्या चपला पासून ते केसा पर्यंत नेहमीच तिने टिप्पणी दिली जाते. टिप्पणी देण्यात काहीच चूक नाही, अरे पण स्वतः तेवढे सक्षम आहात का. आई बाबाच्या घरी लहानपणी पासून हेच सांगितले जाते एक दिवस तुझ्या घरी जायचं आहे व लग्न झाले की हे अस आमच्यात चालत नाही अस तिला म्हणलं जातं. दोन घरांना जोडते ती पण तिच मन समजून घेणारी कमीच व त्यातही तिला नेहमी comprise कराव लागत कधी वडिलांसाठी, नवर्यासाठी, मुलासाठी, भावासाठी, मित्रांसाठी, सासू-सासर्यांसाठी हे सर्व सांभाळून घेणारी ती किती मजबूत असेल.  

         आयुष्यभर एवढी नाती जपते ती, ते ही मर्यादेत राहून. कारण लहान पासून तिला तिच्या मर्यादा दाखवल्या जातात. ती स्वतः शीच संघर्ष करत असते जगण्यासाठी....! 


धन्यवाद..... 

सुप्रिया.

१३/७/२०२१

४.१३ a.m


 (टीप- वरील लेख वैयक्तिक मत असून कुणाच्या ही भावनांना ठेच पोहचवण्याचा उद्देश्य नाही.) 

#वास्तव #स्त्री #मर्यादा

जिव्हाळा,प्रेम आपुलकी - पप्पा  

पहिला पगार 

Subscribe my Youtube channel



1 Comments

Previous Post Next Post