केळफूल | banana flower | kelphul

 

केळफूल | banana flower | kelphul


असंख्य फायदे असणारे केळफूल

फळ म्हणून आपल्याला केळ्याचे फायदे ठाऊक आहेत; परंतु त्यासोबतच पानं, खोड आणि केळफूलदेखील आरोग्यदायी आहे. पूर्वी घराघरात बनवली जाणारी केळफुलाची भाजी आज विस्मरणात गेली आहे. केळफूल हे स्निग्ध, मधुर, तुरट, गुरू, कडसर, अग्निप्रदीपक, वातनाशक तसेच काही प्रमाणात उष्ण आहे. रक्तपित्त, कृमी, क्षय, कोड यावर ते गुणकारी आहे. आपल्या आहारात या केळफुलांचा वापर नक्कीच करू शकतो. बनाना फ्लॉवर म्हणजेच केळफूल आणून त्याची भाजी केली जाते. योग्य केळफूल निवडून चिरणे जरा किचकट व चिकित्सक काम आहे; परंतु त्याचे पौष्टिक गुणधर्म जास्त महत्त्वाचे आहेत.


केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा त्याच्या मध्यभागातून एक दांडा फुटतो. या दांडय़ाच्या अग्रभागी लाल रंगाची फुले येतात व त्यांचे रूपांतर केळीत होते. केळ्याच्या एका घडात ३०० ते ४०० केळी तयार होतात. चंपाकदली, अमृतकदली, मर्त्यकदली, माणिक्यर कदली, लोटण, वेलची केळी, चंपाचिनी इत्यादी केळीच्या मुख्य जाती आढळतात. याशिवाय रंगभेदावरूनही केळीच्या जाती ठरतात. ७०-८० केळ्यांचा फणा ज्यातून निर्माण होतो ते केळफूल फुलासारखं दिसतच नाही. केळफुलाच्या वरची गुलाबी, लाल रंगाची जाड पानं उलगडत गेली की, आत पिवळसर फुलांचे केळ्याच्या घडासारखे घड दिसतात. केळफुलात कोलेस्टोरॉल नाही, साखर नाही, पण भरपूर चोथा आणि कॅल्शियम असतं. सोडियमने समृद्ध असलेल्या या केळफुलात चांगल्या प्रतीची प्रथिनं असतात, तसेच मॅग्नेशियम, आयर्न आणि कॉपरही असतं. केळफुलाचा अर्क साखर नियंत्रणात ठेवतो, शरीरातल्या जंतूंची वाढ रोखतो.


• केळफुल कसे निवडतात

1. Kelphul bhaji / koka bhaji / केळफूल भाजी निवडायला किचकट. कारण, त्यातल्या प्रत्येक फुलातला कडक दांडा आणि पातळ पापुद्रा काढावा लागतो. 

2.पण, ती अतिशय पौष्टिक असल्याने जरूर खावी. चिरल्यानंतर भाजी ताक किंवा लिंबू घातलेल्या पाण्यात घालावी, नाही तर काळी पडते.

3.केळफुलाचा उपयोग भाजी, कोशिंबिरीमध्ये वाफवून किंवा कच्च्या स्वरूपातही खाल्ले जाते. केळफूल निवडताना ताजे, फॉर्म स्वरूपाचे निवडावे. 

4.केळफूल सोलताना हाताला तेल लावावे म्हणजे चिकटपणा व डाग राहत नाहीत. 

5.मोठय़ा केळफुलांत लहान लहान फुलांच्या फण्या असतात. 

6.पूर्ण स्वरूपात या लहान फुलांचा वापर केला जातो. केळफुलाच्या बाहेरील जाड पाने काढून टाकतात. आतील लहान फुलांच्या फण्या बाहेर काढतात. प्रत्येक लहान फुलातील कडक दांडा व त्याच्या खालच्या बाजूला असलेला पांढरा पारदर्शक टोपीसारखा भाग काढून टाकतात; तो चिरला जात नाही व शिजत नाही. बाकी भाग स्वच्छ धुऊन चिरून घेतात.


केळफुलाचे फायदे 

1.केळफुलातील गुणधर्मामुळे रक्त शुद्ध होते. केळफुलामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. म्हणून निमियामध्ये उपयुक्त. 

2.इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोमसारख्या आजारात केळफूल उपयुक्त असते. 

3.केळफुलामुळे प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक स्र्वण्यास मदत होते. त्यामुळे मासिक पाळीमध्ये रक्तस्रवाचा जास्त त्रास होत नाही. जास्त रक्तस्रव होत असेल, तर केळफुले शिजवून दह्याबरोबर खाण्याचा सल्ला दिला जातो. 

4.केळफुलात जीवनसत्त्व ‘क’ ‘अ’, ‘ब,’ ‘के’ फॉस्फरस कॅल्शिअम व आयर्न भरपूर प्रमाणात आढळते. ब्रॉन्कायटिस व पेप्टिक अल्सरमध्ये केळफूल उपयोगी पडते. 

5.स्तनपान देणा-या स्त्रियांमध्ये दूधनिर्मितीसाठी उपयोगी. 

6.चवीत बदल म्हणूनही केळफूल खावे.

 7.भरपूर तंतुयुक्त असल्याने मधुमेही लोकांनी केळफूल जरूर खावे. त्यामुळे पोटही भरते, चवीत बदल होतो व साखर लगेच वाढत नाही. 

8.आतडय़ांचा, स्तनांचा कर्करोग टाळण्यासाठी आहारात केळफूल घ्यावे. 

9.केळफुलाचा केशरयुक्त भाग कापून त्यात मिरपूड भरून ठेवावी व सकाळी ते केळफूल तुपात तळून खावे. त्याने श्वानसविकार लवकर बरा होतो, असे वर्णन आयुर्वेदात केले आहे. 

10.सर्व वयोगटांसाठी केळफूल खाणे उत्तम. बलवृद्धीसाठी उपयुक्त.

11.भारतात अनेक धार्मिक कार्यामध्ये केळं प्रामुख्याने वापरले जाते. त्यामुळे फळासोबत खोड आणि पानंदेखील फायद्याची असतात. 

12.भाजलेल्या जि-यासोबत केळं खाल्यास वजन घटवण्यास मदत होते. 

13.भाजलेल्या जखमेवर केळ्याची साल दाबल्यास दाह कमी होतो. 

14.वेळी-अवेळी लागणा-या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी केळं हे एक उत्तम आणि आरोग्यदायी फळं आहे.


Kelphul bhaji / koka bhaji / केळफूल भाजी


 Banana chips | केळीचे वेफर्स


Subscribe my Youtube channel


2 Comments

Previous Post Next Post