Anda ghotala - अंडा घोटाळा

 Anda ghotala - अंडा घोटाळा 

Anda ghotala is a popular street food recipe in Surat and now is making its way to the street food in Mumbai 
and Pune. It is a high protein dish and is loved by people of all ages. 







INGREDIENTS OF ANDA GHOTALA


4 Servings

12 egg
2 medium onion
3 medium tomato
2 tablespoon chopped ginger
2 tablespoon chopped garlic
2 cup chopped coriander leaves
2 teaspoon pav bhaji masala
2 teaspoon cumin powder
2 tablespoon refined oil
1 teaspoon turmeric
1 teaspoon chilli powder
1 teaspoon mustard seeds
30 grams goat cheese /Optional
1 teaspoon chopped green chilli
4 pinches salt
4 pav
2 tablespoon butter/ghee/oil


HOW TO MAKE ANDA GHOTALA

  1. Boil The Eggs
  2. For making this interesting Anda ghotala recipe, first of all, boil 4 eggs.
  3. Saute Ginger, Garlic, Chillies & Onion
  4. Next, heat oil in a pan. Once hot, add mustard seeds. Let them pop. 
  5. Then add ginger, garlic, green chillies and onions. Saute onions till oil leaves the sides.
  6. Add Tomatoe, Spices & 4 Eggs
  7. Add tomatoes to this. Lightly sauté and then add pav bhaji masala, cumin powder, chilli powder, salt , turmeric. 
  8. Once tomatoes soften break 4 eggs and scramble in this onion tomato masala.
  9. Now Add Boiled Eggs, Grated Cheese & Coriander Leaves
  10. Now add chopped boiled eggs and grated cheese to this scrambled mixture. Top with coriander leaves and toss.
  11. Prepare 4 Sunny Side Up Eggs
  12. In a non-stick frypan, make 4 sunny sides up eggs.
  13. Plate & Serve Your Homemade Anda Ghotala!
  14. Divide the egg tomato-onion mix into four plates and top each one with a sunny side up. 
  15. Serve this Anda Keema Ghotala with butter pav on the side.


Tips


  • You can also add lemon juice to add a refreshing taste to your anda ghotala.
  • Prepare a masala soda shikanji or any cool drink to go with your anda keema ghotala.

अंडा घोटाळा 

तयारीसाठी वेळ: १५ मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
कितीजणांना पुरेल : ३-४

साहित्य:


२ कच्ची अंडी आणि ३ उकडलेली अंडी
१ मोठा कांदा = ९० ग्रॅम्स बारीक चिरलेला
२ मध्यम टोमॅटो =१२५ ग्रॅम्स बारीक चिरलेले
२-३ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली
१ टेबलस्पून आले लसणाची पेस्ट
अर्धा टीस्पून जिरे
पाव टीस्पून हळद
१ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
१ टीस्पून धणे पावडर
१ टीस्पून पाव भाजी मसाला
१ टीस्पून चाट मसाला
मीठ चवीनुसार
तेल

कृती:


1.एका कढई मध्ये ३ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात जिरे घालून तडतडू द्यावे . 
हिरव्या मिरच्या व कांदा घालून मध्यम ते मोठ्या आचेवर नरम होईपर्यंत परतून घ्यावे .

2.मग आले लसणाची पेस्ट घालून त्यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी . पेस्टचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घ्यावी .

3.आता चिरलेले टोमॅटो घालून त्यात थोडे मीठ घालावे . आच बारीक करून टोमॅटो मंद आचेवर शिजू द्यावेत .

4.टोमॅटो शिजले की हळद, लाल मिरची पूड , धणे पावडर , पाव भाजी मसाला आणि चवीपुरते मीठ घालून
 हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा .

5.७-८ मिनिटे मसाला परतून घेतला की त्यात थोडे पाणी घालावे . किसणीने ( मध्यम आकारांच्या छिद्राने ) उकडलेली अंडी किसून घालावीत .

6.अंडी चमच्याने व्यवस्थित मॅश करून घ्यावीत . मग आच मंद करून एक कच्चे अंडे फोडून घालावे .
 नीट एकत्र करून अजून थोडे पाणी घालावे ( टोटल १ कप पाणी वापरले आहे ) . वरून चाट मसाला भुरभुरावा . झाकण घालून मंद 
आचेवर शिजू द्यावे .

7.दुसऱ्या आचेवर एका पॅन मध्ये १-२ टेबलस्पून तेल घालावे . त्यात उरलेले कच्चे अंडे फोडून घालावे . त्यावर मीठ, चाट मसाला आणि
 थोडी चिरलेली कोथिंबीर घालावी . बाजूने गरम तेल चमच्याने वर घालावे म्हणजे अंडे वरूनही शिजेल .

8.अंड्याची ग्रेव्ही आपण ५ मिनिटे शिजू दिलीय . त्यात आता हे अंड्याचे फुल्ल फ्राय घालावे . ते नीट एकत्र करून घ्यावे .

9.या रेसिपीमध्ये आपण अंडे ३प्रकारे वापरली - कच्चे , उकडलेले आणि फुल्ल फ्राय म्हणूनच हा घोटाळा एकदम मजेशीर आहे .

10.हा अंडा खिमा घोटाळा थोडासा दाटसर रस्साच असावा कारण आपल्याला तो पावासोबत खायचा आहे . त्यात आता बारीक चिरलेली 
कोथिंबीर घालून एक्कत्र करावी . अंडा घोटाळा भाजलेल्या पावांसोबत खावयास द्यावा .

2 Comments

  1. तोंडाला पाणी सोडेल अशी रेसिपी आहे..
    आणि लिखाण पण छान आहे

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much sir for this lovely feedback.

      Delete
Previous Post Next Post